bacchu kadu agrowon
मुख्य बातम्या

Bacchu Kadu Latest News : ...अखेर बच्चू कडूंना मिळाला मंत्रिमंडळाचा दर्जा, दिव्यांग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी निवड

Minister Status Bachu Kadu : राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील आमदारांना वेध लागले असताना माजी मंत्री बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.

Team Agrowon

Bacchu Kadu Cabinet Minister : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असताना माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते वारंवार नाराजी व्यक्त करीत होते. त्यांच्या वक्तव्याने शिंदे सरकारची कोंडी होत होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले होते.

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जाहीर करू लागले. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रक काढून राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान राबवले जाणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT