Congress Ashok Chavhan agrowon
मुख्य बातम्या

Congress Ashok Chavhan : मोठी बातमी! काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपसोबत जाण्याची शक्यता

Ashok Chavhan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्य नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्य नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत ४ आमदार प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाण मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मागच्या दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीमधून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. यानंतर मागच्या ८ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. यानंतर मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण नाराज असल्याची किंवा नॉट रिचेबल असल्याच्या माध्यमात बातम्या येत होत्या.

दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विविध पक्षांतील काही बड्या नेत्यांना भारतीय जनता पक्षात यायचे आहे, विशेषत: काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते संपर्कात आहेत. काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांना नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बॅंकेला २०८ कोटींचा नफा

Market Grain Supply: पाचोऱ्यात ज्वारी, मक्याची विक्रमी आवक

Crop Loss Relief Funds: अवेळी आलेल्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा

Agri License Suspension: छत्रपती संभाजीनगरमध्ये बियाण्यांचे १७, खताचे ८९ परवाने निलंबित

Book Review: दुष्काळावर मात करणाऱ्या २३ गावांची कहाणी

SCROLL FOR NEXT