Arun lad Agrowon
मुख्य बातम्या

Arun Lad : चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी अडचणीत : अरुण लाड

Import-Export Policy : केंद्र शासनाच्या अन्यायकारक आयात-निर्यात धोरणातून शेतकरी, शेती संपवण्याचा केंद्राचा उद्योग आहे, अशा शब्दात आमदार अरुण लाड यांनी टिका केली.

Team Agrowon

Sangli News : केंद्र शासनाच्या अन्यायकारक आयात-निर्यात धोरणातून शेतकरी, शेती संपवण्याचा केंद्राचा उद्योग आहे. शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील साखर उद्योग अडचणीत आणला जात आहे.  यामुळे सहकार अडचणीत आला असल्याचे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

आमदार लाड म्हणाले, की तीन महिन्यांत येणाऱ्या कांदा पिकाला आत्ता कुठे चांगले दिवस येत होते तोपर्यंत निर्यातबंदी घालून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. वास्तविक कमी कालावधीच्या पिकामुळे ग्राहकाला जास्त काळ वाढीव दराचा त्रास होत नाही तरीही त्या अल्पकाळासाठी निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याची आवश्यकताच नव्हती. याआधी गहू आणि तांदळाला जगातून मोठी मागणी असताना अचानक निर्यात शुल्क वाढवून किलोला १० रुपयांचा फटका उत्पादकांना बसला.

साखर उद्योगातही निर्यातीचे धोरण दोन टप्प्यात जाहीर केले होते पण वास्तविक एकाच टप्प्यात निर्यात करून पुढच्या टप्प्यातील निर्यातीला अचानक निर्बंध घातल्याने कित्येक व्यापाऱ्यांची आजही कच्ची साखर बंदरात पडून आहे. जगात साखरेची मागणी असतानाही शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील साखर उद्योग अडचणीत आणला जात आहे. यामुळे सहकार अडचणीत आला आहे.

देशात निवडणुका तोंडावर असल्याने वाटेल ते निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. नेतेमंडळी एकमेकांचे वाभाडे काढण्यात मश्गुल असताना कापड, दूध, कुक्कुटपालन या व्यवसायांवरील अन्यायाबाबत एक शब्दही काढला जात नाही. यामुळे शेती, शेतकरी किती दिवस टिकेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार, युवक व शेतीवरील अन्याय कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT