MSEDCL 
मुख्य बातम्या

आम्हाला वीज नको; डीपी, खांब, तारा काढून न्या, आंबे ग्रामपंचायतीचा महवितरण विरोधात ठराव

आंबे गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने बेकायदेशीरपणे खंडीत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टीम ॲग्रोवन

महावितरणने वीजबिल (Electrycity Bill) थकबाकीदारां विरोधातील मोहिम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांत थकबाकीदार शेतकऱ्यांचा (Farmers) वीज पुरवठा खंडित (Power Supply Cut) करण्याच्या कारवाईचा धडाका महावितरणने लावला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. महावितरणच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायतीने (Aambe Grampanchayat) ठराव मंजूर करत महावितरणला इशारा दिला आहे. 

आंबे गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने बेकायदेशीरपणे खंडीत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महावितरणच्या कारवाई विरोधात ग्रामपंचायतीने गावातील  सर्व डीपी, खांब, तारा तसेच कंडक्टर महावितरणने काढून घ्यावे, असा ठराव केला आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानाला महावितरण कंपनी जबाबदार असेल, असा इशाराही दिला आहे. सर्व गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.  

या ठरावानुसार, आंबे गावातून किती वसूली करण्यात आली याची आकडेवारी महावितरणने जाहीर करावी. तसेच बिलांच्या वसूलीतून ३० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला देण्यात येणार होती. ती का देण्यात आली नाही. तसेच सब स्टेशनमधून वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यता आली आहे.

दरम्यान, राज्यात वीजेचा प्रश्न चागंलाच गाजत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कोल्हापूरमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. येत्या शुक्रवारी (ता.४) राज्यभरातील ग्रामीण भागात रास्ता रोको करण्याचा इशाराही दिला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT