cotton with AI
cotton with AI 
मुख्य बातम्या

'AI' च्या मदतीने कापसाचे विक्रमी उत्पादन  

टीम अॅग्रोवन

तेलंगणात या खरीप हंगामात कापसाला  (Cotton)प्रति ८८०० ते ९१०० रूपये असा दर मिळतो आहे. काही ठिकाणी तर १०,००० रुपये प्रति क्विंटल असाही दर मिळतो आहे.  

राज्यातील यंदाच्या दर्जेदार कापसामागचे गुपित मात्र अगदी काही मोजक्या लोकांनाच ठाऊक आहे. तेलंगणातील यंदाच्या कापसाच्या विक्रमी उत्पादनामागे शेतकऱ्यांच्या कष्टांसोबतच माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाने घेतलेली मेहनतही आधारभूत ठरली आहे. आयटी विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करत राबवलेला हा उपक्रम सध्या कौतुकाचा विषय बनला आहे. 

शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे उद्दिष्ट ठेवत राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने हा प्रकल्प राबवला. एआयच्या मदतीने आयटी विभागाने  करीमनगर,नालगोंडा, खम्मम, मेहबूबाबाद,नगरकर्नुल, वनपार्थी या सहा जिल्ह्यांतील कापूस लागवडीत सहभाग घेतला. 

राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग आणि वाधवानी इन्स्टिटयुट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी प्रारंभी संबंधित जिल्ह्यांतील शेतजमिनीचा अभ्यास केला. या प्रकल्पासाठी सहा जिल्ह्यातील २८०० गावांचा समावेश करण्यात आला. 

या प्रकल्पात तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकांच्या विविध टप्प्यातही छायाचित्रे संकलित केली, ज्यावरून कृषी विभागाने किडींबाबातचे अनुमान लावून कीडनाशकांच्या फवारण्यांचे सल्ले दिले. पानांचे बदलते रंग, मुळांचे रंग यावरून कृषी विभागाने योग्य ती कीटकनाशके सुचवली, संबंधित शेतकऱ्यांनी या सूचना अंमलात आणल्या.    

या छायाचित्रांच्या परीक्षणानंतर स्थानिक पातळीवर माहिती तंत्रज्ञान विभाग, कृषी विभाग आणि संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. या संवादात  संबंधित शेतकऱ्याला किडीची शक्यता लक्षात घेऊन वेळीच कीटकनाशकांच्या फवारण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

एआय तंत्रज्ञानामुळे संबंधित शेतकऱ्यांना कापसावरील संभाव्य किडीचा अचूक अंदाज देण्यात आला, विशेषतः  कापसावरील गुलाबी बोन्ड अळीचा बंदोबस्त करण्यात शेतकरी यशस्वी ठरले. पिकांच्या वाढीदरम्यान विविध टप्प्यांवर योग्यवेळी किडींचा प्रादुर्भाव करता आल्याचे परिणाम म्हणून या प्रकल्पात सहभागी सहा जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी दर्जेदार उत्पादन घेतले, ज्याची किंमतही त्यांना मिळताना दिसत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT