दाताळा येथे सेंट्रल बँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.
दाताळा येथे सेंट्रल बँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. 
मुख्य बातम्या

‘स्वाभिमानी’चे सेंट्रल बँकेसमोर अांदोलन

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः दाताळा (ता. मलकापूर) येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवस्थापकाने पीककर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली असतानाच, शनिवारी (ता. २३) स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेचे फलक फाडून काळे फासले. स्वाभिमानी'च्या कार्याकर्त्यांनी या बँक परिसरात घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार, राणा चंदन, प्रदीप शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांना मलकापूर पोलिसांनी या अांदोलन प्रकरणी ताब्यात घेतले. पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार सेंट्रल बँकेच्या दाताळा शाखेत समोर अाला होता.   या प्रकरणी दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीककर्जासाठी गुरुवारी (ता.२१) सेंट्रल बँकेच्या शाखेत गेला होता. कागदपत्रांची पाहणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केल्याचा अारोप अाहे. शाखाधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळा पॅकेज देईन, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला होता. संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली अाहे. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक बी. आर. गावंडे यांनी शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली अाहे. शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाताळा येथे बँकेवर धाव घेतली. राजेश हिवसेला बडतर्फ करून अटक करण्याची मागणी केली. ही कारवाई न केल्यास बँकेचा कारभार चालू देणार नसल्याचा इशारा दिला.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT