राजूर, जि. नगर ः दमदार पावसामुळे येथील भातखाचरे तुडुंब भरली आहेत.
राजूर, जि. नगर ः दमदार पावसामुळे येथील भातखाचरे तुडुंब भरली आहेत. 
मुख्य बातम्या

पावसाचा जोर आेसरला

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी (ता. १८) आेसरला. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत अाहेत. अाज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा जोर ओसरणार आहे, तर मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राने माॅन्सूनला बळकटी दिल्याने गेले काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र, कमी दाब क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील पावसाचा जोर ओसरला. पश्‍चिम विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर ऊन- सावल्यांचा खेळ सुरू होता. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही येत होत्या. 

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. साताऱ्यातील लामज येथे २२७ मिलिमीटर, तर रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे येथे २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)

कोकण : डोलखांब ८३, खोपोली ८४, पोलादपूर ७०, कोंडवी ७८, खेरडी ९७, मार्गतम्हाणे ८५, रामपूर ८०, वाहल ७२, कळकावणे ११०, शिरगाव १२७, वेलवी ७२, खेड ८१, अंबवली ७७, कुलवंडी ७२, धामनंद ७२, अबलोली ८०, फनसावणे ७७, अंगवली ७१, कोडगाव ८८, राजापूर ७५, सवंडल ८३, ओनी ९२, पाचल ७६, भांबेड ११०, विलवडे २०५, जव्हार ८४, साखर ८४, मोखडा ९६. 

मध्य महाराष्ट्र : नाशिक : उभेरठाणा ७५, सुरगाणा ७१, नाणशी ८५, इगतपुरी ८८, धारगाव १०१, पेठ ९८, वेळुंजे १२०, हर्सूल ७९, शेंडी १६०, मुठे ११४, काले ८६, कार्ला ११८, खडकाळा ७६, लोणावळा १३४, राजूर ८५, आंबवडे ८१, जावळी ७०, बामणोली ९५, हेळवाक १२४, मोरगिरी ८६, महाबळेश्‍वर १६५, तापोळा १८७, लामज २२७, बाजार १०९, कोतोली ८६, करंजफेन ८२, आंबा ९१, राधानगरी १२१, साळवण ११०, सिद्धनेर्ली ८५, आजरा ८२, गवसे १५२, चंदगड ७९, हेरे ७४.

मराठवाडा : सिंधी ३०, अर्धापूर २२, दाभड २१, हयातनगर २१. 

विदर्भ : वरूड ६५, पुसाळा ५३, वाठोदा ५०, राजुरा ४२, काटोल ३५, नाकडोंगरी ३०, शिवरा ४६, गाऱ्हा ६१, गंगाझारी ५१, रावणवाडी ५२, तिगाव ३६, ठाणेगाव ३५, गोरेगाव ५५, मोहाडी ३७, पुराडा ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT