नागपूर : कळमणा बाजार समितीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून हास्ययोगा करण्यात आला.
नागपूर : कळमणा बाजार समितीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून हास्ययोगा करण्यात आला.  
मुख्य बातम्या

हास्य योगाद्वारे सरकारचा निषेध

टीम अॅग्रोवन

नागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव पद्धतीने निषेध करीत शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.२१) हास्य योग आंदोलन केले. कळमणा बाजार समिती परिसरात जागतिक योग दिनाला हे आंदोलन करण्यात आले.  गुरुवारी देशभरात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. नागपुरात मात्र संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात कळमना बाजारात शेतकऱ्यांनी हास्य योग करीत शासनाचा निषेध केला. निवडणुकीच्या आधी पिकाला हमीभाव देऊ, उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन देण्यात आले. यातील ऐकाही आश्वासनाची पूर्तता सरकारला करता आला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप होता. आतापर्यंत ३०-४० टक्के पीककर्ज ही वाटप नाही. अच्छे दिन म्हणता म्हणता शेतकऱ्यांना सर्वात वाइट दिवस आले आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आहे. उत्पादन खर्च ही निघणे अशक्य झाले आहे. याचाच निषेध म्हणून कळमना बाजारात शेतकऱ्यांनी हास्य योगा केला. या वेळी संजय सत्येकार, भगवानदास यादव, नारायण ठाकरे, आशीष पाटील, राजू गुडधे, ज्ञानेश्वर चकोले, विष्णू आगाशे, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT