आंबा
आंबा  
मुख्य बातम्या

आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री याेजनेअंतर्गत यंदाच्या आंबा महाेत्सवात १५ काेटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर १ हजार १०५ टन आंबा निर्यातीमधून २० काेटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  श्री. पवार म्हणाले, की काेकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा ग्राहक आणि ग्राहकांना विश्‍वासार्ह आणि दर्जेदार हापूस आंबा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पणन मंडळाच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येत आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार फक्त पुणे शहरात हाेणारा आंबा महाेत्सव आता विविध शहरांमध्ये आयाेजित केला जात आहे. यंदा पुणे आणि इंदूरसह २३ शहरांमध्ये महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ‘‘पुणे शहरात पणन मंडळाच्या आवारासह बालंगर्धव रंगमंदिरातदेखील आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या महाेत्सवामध्ये तळ काेकणासह मध्य काेकणातील विविध जिल्ह्यातील १०० शेतकरी सहभागी झाले हाेते. थेट शेतकऱ्यांकडून आंबा विक्री हाेत असल्याने काेणत्याही रसायनांशिवाय नैर्सगिकरीत्या पिकविलेला आंबा ग्राहकांना उपलब्ध झाला हाेता’’, असे पवार यांनी सांगितले. निर्यातीमधून २० काेटींचे परकी चलन  महाराष्ट्रातून जास्तीत जास्त शेतीमाल विविध देशांमध्ये निर्यात व्हावा, यासाठी विविध भागांमध्ये ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामधील नवीमुंबई, रत्नागिरी, देवगड, जालना, बीड, लातूर या पाच ठिकाणांवरील आंबा निर्यात केंद्रांमधून १ हजार १०४ टन आंबा निर्यात करण्यात झाला असून, याद्वारे सुमारे २० काेटींचे परकी चलन शेतकऱ्यांना मिळाले आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार यंदा १ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. मंडळाने उद्दिष्टपूर्ती करत १ हजार १०४ टन आंबा निर्यात केला असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  विविध देशांमध्ये झालेली निर्यात आणि त्याची रक्कम पुढीलप्रमाणे (काेटींमध्ये) 

देश   टन  रुपये
अमेरिका   ५४०.१८  ११.५७ 
युराेप    ४४६.७१   ५.७३ 
आॅस्‍ट्रेलिया   १७.१८  ०.३६ 
जपान    २३.६९   ०.३५
न्यूझीलंड   २८.७०   ०.७७   
 रशिया       ७.५१    ०.१३
दक्षिण काेरिया    ४०.९६     ०.७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT