ईशान्येकडील राज्यांसाठी नवी गहू जात ‘करण वंदना’
ईशान्येकडील राज्यांसाठी नवी गहू जात ‘करण वंदना’  
मुख्य बातम्या

ईशान्येकडील राज्यांसाठी नवी गहू जात ‘करण वंदना’

वृत्तसेवा

ईशान्येकडील पठारी प्रदेशासाठी सिंचित क्षेत्र आणि वेळेवर पेरणीसाठी करण वंदना (डीबीडब्ल्यू १८७) ही जात प्रसारित करण्यात आली आहे. प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांसाठी ही जात उपयुक्त ठरणार आहे.  नव्याने प्रसारित केलेल्या गहू जातीचा प्रसार करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या करनाल येथील भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील महायोगी गोरखनाथ कृषी विज्ञान केंद्राच्या सहकाऱ्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या १०० शेतकऱ्यांमध्ये कोकीला अर्जून देवी या महिला शेतकरीही होत्या. त्यांनाही सर्व शेतकऱ्यांसोबत करण वंदना या नव्या जातींचे २.५ किलो बियाणे मिळाले होते. हे बियाणे त्यांनी आपल्या गावी म्हणजेच राखूखोर (ता. जंगलकौडिया, जि. गोरखपूर) येथे नोव्हेंबर २०१८ च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लावले. श्रीमती कोकिला यांनी शिफारशीप्रमाणे १५०ः६०ः४० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश अशा खतांचा डोस दिला. त्याच प्रमाणे दोन वेळा सिंचन केले. पीक कालावधीमद्ये माणसांकरवी दोन वेळा तण काढून घेतले. योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे १० एप्रिल २०१९ रोजी केलेल्या काढणीमध्ये केवळ २६६ वर्गमीटर क्षेत्रामध्ये २२० किलो गहू उत्पादन मिळाले. हे प्रमाण ८२.५२ क्विंटल प्रति हेक्टर इतके होते.  अन्य शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ ः  प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या २.५ किलो बियाणांची लागवड केलेल्या अन्य काही शेतकऱ्यांनाही ८० ते २२० किलोपर्यंत चांगले गहू उत्पादन मिळाले आहे. कोकिला देवींसह अन्य शेतकऱ्यांनाही कमी क्षेत्रामध्ये चांगले उत्पादन मिळाल्यामुळे अन्य शेतकऱ्यांमध्येही या नव्या जातीविषयी उत्सुकता वाढली आहे.  गहू जातीची वैशिष्ट्ये ः 

  • सध्याच्या या प्रदेशातील प्रमुख गहू जाती एचडी २९६७, के -३०७, एचडी २७३३, के १००६ आणि डीबीडब्ल्यू ३९ या आहेत. या प्रचलित जातीपेक्षा नव्याने प्रसारित केलेल्या जातींचे उत्पादन लक्षणीयरीत्या अधिक आहे. 
  • ही जात तांबेरा आणि करपा या दोन प्रमुख रोगासाठी प्रतिकारक आहे. 
  • ही जात ७७ दिवसांमध्ये फुलोऱ्यामध्ये येते आणि पेरणीनंतर सुमारे १२० दिवसांमध्ये पक्वता गाठते. 
  • गहू रोपांची सरासरी उंची १०० सेंमी असून, या जातीची हेक्टरी उत्पादनक्षमता ६४.७० क्विंटल इतकी आहे. 
  • या गव्हापासून तयार केलेल्या चपात्यांचा दर्जा उत्तम असून, त्याला १० पैकी ७.७ गुण देता येतात. 
  • दाण्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक (४३.१ पीपीएम) आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT