शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू महत्त्वाचे
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू महत्त्वाचे 
मुख्य बातम्या

शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू महत्त्वाचे

वृत्तसेवा

स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील उपयुक्त जिवाणू अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हे जिवाणू वेगळे करून त्यांचा वापर कृषी उत्पादन अधिक शाश्वत करणे शक्य असल्याचा दावा फ्लिंडर्स विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. फ्लिंडर्स विद्यापीठ, ला ट्रोब विद्यापीठ, CSIRO संस्थेतील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये स्थानिक झाडे झुडपांच्या मुळांजवळील उपयुक्त जिवाणू पीक उत्पादनाच्या शाश्वततेसाठी आणि मातीच्या जैविक आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे समोर आले आहे. त्याविषयी माहिती देताना फ्लिंडर्स विद्यापीठातील अभ्यागत संशोधक डॉ. रिकार्डो अरावजो यांनी सांगितले, की औषध व्यवसायामध्ये विविध प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी सूक्ष्मजीव महत्त्वाचे असतात. त्याच प्रकारे विविध नैसर्गिक पर्यावरणामध्ये मुबलक आढळणारे जिवाणू (अॅक्टोनोबॅक्टेरिया) वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. हे सूक्ष्मजीवांचे समुदाय जागतिक कार्बन साखळीमध्ये मोलाचे असून, विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता करतात. परिणामी पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. ते पर्यावरणासाठीही पूरक ठरतात. ऑस्ट्रेलियातील कोरड्या आणि उष्ण वातावरणामध्ये त्यांची संख्या मोठी आहे. असा झाला अभ्यास

  • दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया येथील विविध प्रदेशामध्ये आढळणारी सूक्ष्मजीवांची विविधता या अभ्यासामध्ये तपासण्यात आली आहे. त्यांची जनुकीय माहिती गोळा करण्यात आली. जनुकीय माहिती उपलब्ध नसेल, ती वेगवेगळे माती नमुने घेऊन तयार करण्यात आली. त्यासाठी मुख्य भूमी, तस्मानिया बेट, किंग बेट, ख्रिसमस बेट येथील नमुने तपासण्यात आले. या नमुन्यांची तुलना उत्तम अंटार्क्टिकावरील माती नमुन्यांशी करण्यात आली.
  • ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीवरील २२११ अॅक्टिनोबॅक्टेरियाचे आणि तस्मानिया, किंग, ख्रिसमस इ. ठिकाणचे ४९० अॅक्टिनोबॅक्टेरियाचे विश्लेषण करण्यात आले.
  • CSIRO संस्थेचे कृषी आणि अन्न विषयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुप्ता वडकट्टू यांनी सांगितले, की मातीतील विविध जिवाणूंची विविधता ही शेती क्षेत्राच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारी आहे. स्थानिक वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या जिवाणू हे शेजारच्या शेतीक्षेत्रासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरू शकतात. भविष्यातील शाश्वत उत्पादनासाठी त्यांची नक्कीच मदत होऊ शकते.
  • या परिसरामध्ये अलग अलग बेटे असल्यामुळे या उपयुक्त जिवाणूंच्या मोकळ्या प्रसाराची संधी तुलनेने कमी आहेत.
  • हे जिवाणू शेतीबरोबरच मानवी आणि प्राण्याच्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतील.
  • या जिवाणूंची विविधता आणि संरचना ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. त्यांचे विविध प्रकार हे अगदी वाळवंटापासून अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशापर्यंत पसरलेले आढळून येतात. त्यांच्याविषयी जितके जाणून घेता येईल, तितका त्यांचा वापर करून घेणे शक्य होणार असल्याचे प्रो. फ्रॅन्को यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT