नवं तंत्र, पूरक उद्योगामुळे उत्पन्नात झाली वाढ
नवं तंत्र, पूरक उद्योगामुळे उत्पन्नात झाली वाढ 
मुख्य बातम्या

नवं तंत्र, पूरक उद्योगामुळे उत्पन्नात झाली वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा

उत्तर पूर्वेकडील राज्याच्या दक्षिण गोरो हिल्स जिल्ह्यातील अकरा गावांच्यामधील शेतकरी सुधारित पद्धतीने शेती व्यवस्थापनाकडे वळले आहेत. या शेतकऱ्यांनी शेतीच्या बरोबरीने कुक्कुटपालन, वराहपालन, बदकपालनास सुरवात केली आहे. पूरक उद्योगामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

पूरक उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बारापानी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. तंत्रज्ञान प्रसारासाठी आरआरटीसी या स्वयंसेवी संस्थेची चांगली मदत झाली आहे.  या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणजे भात. पारंपरिक पद्धतीने लागवड करण्याएेवजी हे शेतकरी आता एसआरआय पद्धतीने भात लागवडीकडे वळले आहेत. शिवबारी, दिपलीपारा, जदुगिरी या गावांच्याबरोबरीने परिसरातील सात गावांतील शेतकऱ्यांना पूर्वी पारंपरिक पद्धतीने भाताचे १.५ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळत होते. हेच उत्पादन आता ४.८ टन प्रति हेक्टरवर गेले आहे. उत्पादनाच्या वाढीमुळे परिसरातील इतर गावातील शेतकरी आता एसआरआय पद्धतीने भात लागवडीकडे वळले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीमध्ये चांगला बदल दिसून आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे लागवड योग्य जमीन आहे ते सुधारित पीक पद्धतीचा अवलंब करीत आहेत. ज्यांच्याकडे शेती नाही असे लोक शेळीपालन, वराहपालनाकडे वळाले. त्यामुळे वर्षभराचे उत्पन्नाचे साधन त्यांना मिळाले आहे.  ज्या शेतकऱ्यांच्याकडे छोटी शेततळी आहेत,ते शेतकरी मत्स्यपालन करतात. त्यामुळे या भागातील मत्स्यउत्पादनातही चांगली वाढ झाली आहे. काही शेतकरी बदकपालनाकडे वळले आहेत. या भागातील बहुतांश महिला परसबागेत बदक पालन करतात. बदक सांभाळण्यासाठी फारसा खर्च नाही, तसेच परिसरात बदकांना चांगली मागणी असल्याने विक्रीही चांगल्या प्रकारे होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT