उद्धर येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक "ऍटलास मॉथ" 
मुख्य बातम्या

उद्धर येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक "ऍटलास मॉथ"

"ऍटलास मॉथ" हां पतंग अतिशय मोहक आहे. दुर्मिळ असलेला हा पतंग सहज दिसत नाही. पच्छिम घाटात हे पतंग दिसतात. हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे.

अमित गवळे

पाली, जि. रायगड : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ऍटलास मॉथ" सुधागड तालुक्यातील उद्धर येथे सापडले. येथे राहणारे तुषार केळकर यांच्या घरासमोरील झाडावर हे पतंग (फुलपाखरु) काही काळ विसावले होते.

जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये "ऍटलास मॉथ" ची गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच  त्याला  "ऍटलास पतंग" म्हणतात. याच्या पंखांची लांबी साधारणपणे 11 ते 12 इंच किंवा 25 सेमी इतकी असते. याचे खास वैशिष्ट म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने तोंड आणि पचन संस्थेची गरज भासत नाही. या अल्प कालावधीतच प्रणय करून आपला वारसा (अंडी घालून) मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेले हा जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो. महाराष्ट्रात भीमाशंकर आणि बोरिवली नॅशनल पार्क तसेच इतर काही जंगलांमध्ये "ऍटलास मॉथ" सापडतो. सुधागड तालुक्यात उद्धर सारख्या गावात हा वैशिष्ठपूर्ण पतंग आढळल्याने समाधान होत असल्याचे तुषार केळकर यांनी सकाळला सांगितले. 

"ऍटलास मॉथ" चा जीवन प्रवास  हां पतंग दालचीनी, लींबू, जांभुळ, पेरू व लींबू वर्गीय झाडांवरच आढळतो. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून सुरवंट (आळी) बाहेर येते. हे सुरवंट 35 ये 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. त्यानंतर त्याचे कोशात रूपांतर होते. एकविस दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येते. हे पतंग (फुलपाखरु) अवघे आठवडाभर जगते. या दरम्यान प्रणय करून अंडी घालणे हा या पतंगाचा शेवटचा जीवन प्रवास असतो.

मानवी वस्तीत आलेल्या कोणत्याही प्राणी व किटकास ईजा करू नये. त्याला त्याच्या नैसर्गिक आधिवासात मुक्त संचार करू द्यावा. आमच्या झाडावर आलेल्या या पतंगास कोणतीही ईजा न होऊ देता त्याला निसर्गात मुक्त फिरू दिले. - तुषार केळकर, उद्धर, प्राणीमित्र

हां पतंग अतिशय मोहक आहे. दुर्मिळ असलेला हा पतंग सहज दिसत नाही. पच्छिम घाटात हे पतंग दिसतात. हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. नरापेक्षा मादी मोठी असते. नराला जास्त आच्छादन असलेला ऐंटेना असतो. तर मादीला पातळ आच्छादन असलेला ऐंटेना असतो. मादी फेरोमोन्स नावाचे एक द्रव्य हवेत सोडते आणि नराला प्रणय करण्यासाठी आकर्षित करते. नराला काही किलोमीटरवरून सुद्धा  फेरोमोन्सचा गंध येतो. अशाप्रकारे आपल्या उण्यापुऱ्या 5 ते 7 दिवसांच्या आयुष्यात हे पतंग आपला वारसा ठेवून जातात. - रामेश्वर मुंढे, पर्यावण अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?

District Collector Award: ई-गव्हर्नन्सबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

Unseasonal Rain: 'अवकाळी'सह गारपिटीचा तडाखा सुरुच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला झोडपले, कांदा, गहू पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर बनविणार

SCROLL FOR NEXT