चिंच
चिंच 
मुख्य बातम्या

नगर येथे चिंच ९३९९ ते ११,८५० रुपये क्विंटल

Suryakant Netke

नगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात गहू, तूर, ज्वारीची चांगली आवक झाली. गुळडाग व चिंचेची आवकही वाढली आहे. बाजार समितीत चिंचेला ९३९९ ते ११ हजार ८५० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. गव्हाची सप्ताहात ९०६ क्विंटल आवक झाली. गव्हाला १६५१ ते १७५२ रुपये क्विंटल दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

नगर बाजार समितीत भुसारची आवक बऱ्यापैकी होत असते. सध्या हरभरा, ज्वारी, गहू, तुरीची आवक जास्त आहे. चिंच, गुळडागाच्या आवकेलाही सुरवात झाली आहे. बाजार समितीत बाजरीची ६८ क्विंटल आवक झाली. बाजरीला १०६० ते १२५० रुपये क्विंटल असा दर मिळाला. तुरीची २३६ क्विंटल आवक झाली. तुरीला ३३०० ते ३९०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

हरभऱ्याची ४१७ क्विंटल आवक झाली. हरभऱ्यास ३०२५ ते ३६५१ रुपये क्विंटल दर मिळाला. मुगाची आवक कमी झाली आहे. मुगाला ४००० ते ५३०१ रुपये क्विंटल दर मिळाला. लाल मिरचीची २१९ क्विंटल आवक झाली. लाल मिरचीला ४३६५ ते ९२१५ रुपये क्विंटल असा दर मिळाला. 

गुळडागाची ५३९१ क्विंटल आवक झाली. गुळडागाला २३७५ ते ३२२५ रुपये क्विंटल असा दर मिळाला. बाजार समितीत हरभरा, ज्वारीची अजून आवक वाढेल असे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT