संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे   : राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रविवारपासून (ता.२६) पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता अाहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार असून, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम बंगाल आणि परिसरामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे रविवारपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे उत्तर आणि पूर्व भारतामध्ये, तसेच दक्षिणेकडील राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता.२४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्राोत - कृषी विभाग) : कोकण : न्याहडी ३६, गोरेगाव ३०, बदलापूर ३०, पोयंजे ६४, ओवले ७२, कर्नाळा ६५, तलोजे ५५, मोराबी ६५, नेरळ ४१, कळंब ४०, आटोने ३१, शिरगाव ५२, बुरोंडी ४५, दाभोळ ४२, अंजर्ला ५९, वाकवली ४७, पालगड ५१, वेळवी ४९, शिर्शी ३८, अांबवली ४४, देव्हरे ३२, तरवल ३४, मुरडव ३०, फुणगूस ३८, फणसावणे ३२, अंगवली ३६, कोडगाव ४२, तुलसानी ४९, तेरहे ३७, पाचल ३६, मालवण ३५, अांबोली ८७.

मध्य महाराष्ट्र : त्र्यंबकेश्‍वर २१, साकीरवाडी २०, शेंडी ३२, माले २७, मुठे ४५, भोलावडे २७, आंबवडे २६, निगुडघर ३३, लोणावळा ३१, वाडा २८, हेळवाक ३३, महाबळेश्‍वर ५०, तापोळा ५५, लामज ७३, करंजफेन ४३, आंबा ५८, राधानगरी २९.

विदर्भ : शेलू बाजार ३०, शेंबळ २६, तरडगाव ७०, भामरागड ६६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT