जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू ः एकनाथ शिंदे
जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू ः एकनाथ शिंदे  
मुख्य बातम्या

जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू ः एकनाथ शिंदे

टीम अॅग्रोवन

मुंबई ः राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या औषध खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची मंत्रालय स्तरावर उच्च अधिकारी नेमून चौकशी करण्यात येईल आणि संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची एक आठवड्याच्या आत बदली करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता. २६) विधानसभेत दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली. याबाबत जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी ठराव करून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना हलवावे, अशी मागणी केली होती. त्या संदर्भात एकनाथ खडसे यांनी सभागृहात माहिती दिली, याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट आहे, म्हणून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर अधिकारी नेमून चौकशी करावी आणि त्या अधिकाऱ्याची आजच्या आज बदली करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. तक्रारी प्राप्त झाल्याची वस्तुस्थिती आहे, म्हणून त्या डीएचओची मंत्रालय स्तरावरील अधिकारी नेमून चौकशी केली जाईल आणि त्यांची अधिवेशन संपण्याच्या आत त्या पदावरून बदली केली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात वैद्यकीय बिले देताना लोकांची अडवणूक केली जाते. याच कार्यालयात साहित्य खरेदी, औषध खरेदी, अन्य खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत खडसे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT