मंगरुळ परिसरात पावसाने सोयाबीनचे नुकसान
मंगरुळ परिसरात पावसाने सोयाबीनचे नुकसान 
मुख्य बातम्या

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका

टीम अॅग्रोवन

पुणे  : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २) रात्री उशिरा लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यांतील उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यांत वादळी पावसाने दणका दिला. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे ऊस, केळी बागांना फटका बसला असून, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकासह इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. चांदवड (जि. नाशिक) तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने द्राक्षे, टोमॅटो, फुलशेतीचे नुकसान झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज (ता.४) वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उस्मानाबादमधील उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. पाडोळी येथे २४ तासांत ७२ मिलिमीटर पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे ऊसाचे पीक आडवे झाले. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे १३० मिलिमीटर, तुळजापूर ८५ पावसाची नोंद झाली. मंगरुळ (ता. तुळजापूर) परिसरात शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाचे व केळीच्या बागांचेही नुकसान झाले. पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील देवरगाव परिसरात वादळी वारा आणि त्यानंतर अर्धा तास गारांचा पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांसह, टोमॅटो व फुलशेतीचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली कोल्हापूरमध्ये पावसाने हजेरी लावली. कोकणातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वादळी पावसाने दणका दिला असताना राज्याच्या तापमानाही वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव, सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता. २) राज्याच्या विविध भागांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : मार्गताम्हाणे २०, कळकवणे ३०, दाभील २८, धामनंद ४२, फणसावणे ४२, मदुरा २७, वैभववाडी २५.    मध्य महाराष्ट्र : उमराळे ११, घोटी २९, धारगाव २८, पेठ ३४, जोगमोडी १३, वडाळी १०, त्र्यंबकेश्‍वर १४, वेळुंजे १६, पारनेर १८, सुपा १६, कोळेगाव १६, खर्डा १०, शेंडी १०, कोतूळ ५०, माले १०, मुठे १६, बेल्हा १६, उपळाई १३, गौडगाव ३९, भेडसगाव २१, करकंब २२, पटवर्धन कुरोली ३२, इस्लामपूर १०, वेळापूर १२, अपशिंगे १०, केळघर १४, हेळवाक १५, तारळे २५, किन्हई २५, खटाव २०, महाबळेश्‍वर १२, तापोळा १४, लामज १८, मालगाव ४२, विटा ३७, कडेगाव १०, शिराेळ १७, जयसिंगपूर ११, नेसरी २०, गारगोटी १०, पिंपळगाव २३, कडेगाव १५, कराडवाडी १२, गवसे ३६, चंदगड १७, नारंगवाडी १३, कोवाड २७, हेरे ८५. मराठवाडा : औसा ५५, लामजना ३२, मातोळा ४८, भादा २१०, किनी २०, निलंगा ५८, पानचिंचोली २१, नळेगाव ३६, उस्मानाबाद शहर ५१, बेंबळी ४१, पाडोळी ७२, कासेगाव ३३, ढोकी २५, तेर २३, तुळजापूर ८५, सालगारा १७, सावरगाव ३१, मंगरूळ १३०, लोहारा २०, माकणी २८, वाशी १५.

आकडेवारीतील घोळ कायम औसा (जि. लातूर) तालुक्यातील भादा येथे बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अतिवृष्टी होत तब्बल २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भादा येथे ६८ मिलिमीटर पाऊस झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कृषी विभागाकडून मंडलनिहाय प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या पावसाच्या आकडेवारीतील घोळ अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.   राज्याच्या उत्तर भागातून माॅन्सून परतला नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू असून, बुधवारी (ता.३) मॉन्सूनने राज्याच्या उत्तरेकडील काही भागांतून माघार घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील, नंदुरबार, धुळे, जळगाव, तर विदर्भातील गोंदियापर्यंतच्या भागांतून माॅन्सून परतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अरबी समुद्रामध्ये शुक्रवारपर्यंत (ता. ५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, तीव्रता वाढून त्याचे ‘चक्रीवादळात’ रूपांतर होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT