ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी  
मुख्य बातम्या

ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी मिळून एक कोटी १८ लाख ९२ हजार ११८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून एक कोटी ३५ लाख १४ हजार ६४० क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ११.३६ टक्के एवढा आहे. यंदा ऊस गाळपात इंदापूर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप केल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.   

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने बहुतांश कारखान्यांनी १ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू केला होता. जिल्ह्यात एकूण सहकारी ११ व खासगी ६ साखर कारखाने सुरू होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता २५०० ते ७५०० मेट्रिक टन एवढी आहे. आत्तापर्यंत १३ साखर कारखान्यांचा गळीत बंद झाला आहे. पाणी व चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर मार्चअखेरपर्यंत हंगाम सांगता होण्याचा अंदाज होता. परंतु, उसाची उपलब्धता अधिक असल्याने यास उशीर होत आहे. 

साखर कारखान्यांनी १२ फेब्रुवारीपासून गळीत हंगाम लवकर संपविण्याचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यात भीमा पाटस या साखर कारखान्याने १२ फेब्रुवारी, तर व्यंकटेशकृपा या खासगी साखर कारखान्याने २१ फेब्रुवारीला गळीत हंगाम बंद केला होता. सहकारी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ७८ लाख ५६ हजार २४९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ८९ लाख ३१ हजार १६५ क्विटंल साखरेचे गाळप केले आहे. साखर उतारा सरासरी ११.३७ टक्के एवढा आहे.

खासगी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ४० लाख ३५ हजार ८६९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४५ लाख ८३ हजार ४७५ क्विटंल साखरेचे गाळप केले आहे. साखर उतारा सरासरी ११.३६ टक्के एवढा आहे. इंदापूर सहकारी साखर कारखान्यांनी १० लाख ४८ हजार २१६ मेट्रिक टन उसाचे सर्वाधिक गाळप केले आहे. त्यातून ११ लाख ८७ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा सरासरी ११.३३ टक्के एवढा आहे.

त्यापाठोपाठा बारामती अॅग्रो साखर कारखान्याने १० लाख ३४ हजार ७८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ११ लाख ९९ हजार ५५० क्विटंल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा ११.६० टक्के एवढा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT