निताने येथे वीजवाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग
निताने येथे वीजवाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग 
मुख्य बातम्या

निताने येथे वीजवाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग

टीम अॅग्रोवन
   नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील जयंत देवरे यांच्या उसाच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. या आगीत उसाबरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. नागरिकांच्या प्रयत्नात आग विझविल्याने पुढील नुकसान टळले.      निताने शिवारातील जयंत देवरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४१२ मध्ये (ता.१४) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतावरून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या शेताला आग लागली. पाण्याअभावी उसाच्या सुकलेल्या पाचटाने तत्काळ पेट घेतल्याने लागवड क्षेत्रातील निम्यापेक्षा अधिक ऊस जळाला. तसेच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने देवरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारील शेतकरी महेंद्र देवरे यांना आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सदस्य वसंत पवार, अमोल देवरे, संजय देवरे, किरण अहिरे, मनू देवरे, केतन खैरनार, पप्पू पवार, दिनेश देवरे, रामकृष्ण देवरे, जीभाऊ देवरे व परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने लागलेली आग विझविली. तलाठी एस. एस. भालेराव यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.     वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा?    जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरून वीजतारा लोंबकळत आल्याचे निदर्शनास येते. तरीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारा धोकादायक तर आहेतच मात्र, शेतीकामात अडचणी आणणाऱ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT