यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस खरेदी Purchase of fifty thousand quintals of cotton in Yavatmal
यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस खरेदी Purchase of fifty thousand quintals of cotton in Yavatmal 
मुख्य बातम्या

यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ५० हजार क्विटंलच्या वर कापूस खरेदी झाली आहे. दिवाळीपूर्वीच कापूस वेचणीला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस आहे. शेतकरी शासकीय खरेदी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. परंतु परतीच्या पावसाने कापूस भिजल्याने ओलावा अधिक होता. सीसीआयकडून १२ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाचीच खरेदी केली जाते. परिणामी सीसीआयने असर्मथता दर्शविली. त्यामुळेच दिवाळीनंतर सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस आणायला सुरुवात झाली आहे. सीसीआयच्या राळेगाव, पांढरकवडा, वणी, खैरी, घाटंजी, शिंदोला तसेच मुकुटबन केंद्रावर कापसाची आवक वाढली आहे. सीसीआयकडून ५ हजार ८२५ रुपये प्रति क्विंटल दरात कापूस खरेदी केली जात आहे. सध्या खासगी बाजारातही कापसाला ५ हजार ७२५ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे काही शेतकरी खासगी बाजाराकडे गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना नगदी रक्कम मिळत असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापूस विक्री करीत आहे. सीसीआयकडून दोन दिवसानंतर चुकारे दिले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चुकारे गतीने होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी शेतकरी आणण्याची शक्‍यता आहे.

पणन केंद्राबाबत संभ्रम सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र पणनकडून अजूनही मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणनकडून तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. परिणामी, अनेक भागांतील शेतकरी पणनचे केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT