तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव
तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव 
मुख्य बातम्या

तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव

टीम अॅग्रोवन

अकोला ः  कपाशीचे पीक आता दोन महिन्यांचे होत असतानाच गुलाबी बोंड अळी दिसून आली आहे. तेल्हारा तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड असलेल्या कपाशीच्या पिकात दोन शेतांमध्ये ही अळी ३० ते ३५ टक्के या प्रमाणात आढळली. कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली व शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.  तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील अशोक अहेरकर यांनी ७ जूनला व वासुदेव पाचपोर यांनी २८ मे रोजी कपाशीची लागवड केलेली आहे. कपाशीचे हे पीक ५० ते ५५ दिवसांचे झालेले आहे. पिकाची फूल व कळी अवस्था असून या दोन्ही शेतांमध्ये  ३० टक्क्यांपर्यंत अळ्या आढळून आल्या आहेत. अळीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती मिळताच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ विभागप्रमुख डॉ. डी. बी. उंदीरवाडे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे, मंडळ कृषी अधिकारी उमेश कदम, कृषी सहायक श्री. चोपडे, श्री. डांगे यांच्या पथकाने भेट देत पाहणी केली.   इतर गावांमधूनही तक्रारी तालुक्यात इतर गावांमधूनही तक्रारी यायला सुरवात झाली आहे. रायखेड येथे अळी आल्याच्या तक्रारीची दखल घेत गुरुवारी (ता. १) पथकाने तेथे भेट दिल्याची माहिती आहे. डोमकळ्या वेचून नष्ट करा ः वानखेडे    कपाशीमध्ये तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळीबाबत तक्रारी येत आहेत. कोठा गावात भेट दिल्यानंतर अळी असल्याचे दिसून आले. या शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी डोमकळ्या वेचून नष्ट करण्याचा तसेच शेतात फेरोमोन सापळे लावण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय निंबोळ्या उपलब्ध असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. फुलामध्ये ५ टक्के प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस किंवा क्लोरपायरीफॉस २५ मिली प्रती १० लीटर पाण्यातून नॅपसॅक पंपाद्वारे फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT