कांदा
कांदा  
मुख्य बातम्या

केंद्राकडून बंगळूरच्या गुलाबी कांद्याच्या निर्यातीला परवानगी

टीम अॅग्रोवन

नाशिक: भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बंगळूरच्या गुलाबी कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी देत असल्याची माहिती विदेश व्यापार विभागाचे महासंचालक बिद्युत स्वेन परिपत्रकाद्वारे  दिली आहे. कांद्याच्या निर्यातीमध्ये आणि साठवणुकीवर मर्यादा घातल्याने देशांमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले होते. कांद्याच्या वाढलेले दर नियंत्रित करण्यासाठी  केंद्र सरकारने २९ सप्टेंबर रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या  कर्नाटक राज्यातून नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवार (ता. २८) बंगळूरच्या गुलाबी कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिली आहे. याबाबत जाहीर केलेल्या निर्णयात नऊ हजार टनांपर्यंत या कांद्याची निर्यात करता येणार असून, चेन्नई बंदरावरून या कांद्याची निर्यात करता येणार आहे. यासाठी कांदा निर्यातदार यांना फलोत्पादन आयुक्त कर्नाटक यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यामध्ये ३० नोव्हेबरपर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे. ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले आहे, त्यांना विदेश व्यापार विभागाच्या अतिरिक्त महासंचालक कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार पुढील निर्यात विषयक कामकाज होणार आहे.  महाराष्ट्राला दिलासा कधी देणार? केंद्राकडून घेण्यात आलेल्या कांदा निर्यातबंदी च्या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेऊन फक्त कर्नाटक राज्यकरिता म्हणजेच बंगळूर गुलाबी कांद्यापर्यंत निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील लाल कांदाही आता काढणीसाठी सुरू होईल, तर राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा कधी देणार असा सवाल नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT