जिनिंगच्या पडताळणीसाठी भरारी पथक ः मुद्गल
जिनिंगच्या पडताळणीसाठी भरारी पथक ः मुद्गल 
मुख्य बातम्या

जिनिंगच्या पडताळणीसाठी भरारी पथक ः मुद्गल

टीम अॅग्रोवन

नागपूर ः गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जिनिंग प्रेसिंगमध्ये पूरक उपाययोजनांच्या पडताळणीकरिता भरारी पथक तयार करण्यात येणार आहेत. त्यांनी जिनिंग प्रेसिंगची तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आश्विन मुद्गल यांनी दिले. छत्रपती सभागृहात आयोजित कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. एस. आर. वासनिक, डॉ. विश्‍लेष नगरारे, प्रा. डॉ. राहुल वडस्कर, डॉ. अनिल मोरे, प्रा. राम गावंडे, प्र. दि. देशमुख, तंत्र अधिकारी अर्चना कोचरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुद्गल या वेळी जिल्ह्यातील पीक पेरणीस्थितीचा आढावा घेतला. भविष्यात पावसाने दडी मारली अथवा अतिवृष्टी झाल्यास पीकविमा, पिकांवर पडणारे रोग, कापूस आणि मका पिकांवरील गुलाबी बोंड अळी आणि अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याची सूचना त्यांनी केली.  गुजरातच्या धर्तीवर जिनिंग प्रेसिंग आणि कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. औषधे, खते आणि बी-बियाणे तपासणीसाठी भरारी पथके नेमली जातात, तशी भरारी पथके नेमावीत. या पथकांनी जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांमध्ये बोंड अळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप लावले आहेत किंवा नाही याची पडताळणी करावी. तेथील कीडयुक्‍त कापूस बियाणे नष्ट केल्याची तपासणी करून त्याचा अहवाल देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी मुद्गल यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT