पीक नुकसान
पीक नुकसान  
मुख्य बातम्या

विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाक

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीचा विमा परतावा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी ७२ तासांत दस्तऐवजांसह क्‍लेम दाखल केले. आता मात्र पंचनाम्यांसाठी कंपनीचे प्रतिनिधी ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  महागाव तालुक्‍यात ६८ हजार ४९८ हेक्‍टरवर विविध खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यामध्ये २१ हजार १७५ हेक्‍टर सोयाबीन, २५ हजार २०० हेक्‍टरवर कपाशी व उर्वरित क्षेत्रावर तूर, हळदीसह इतर पिकांचा समावेश आहे. सप्टेंबर तसेच ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाने बहुतांश क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. त्या पार्श्‍वभूमीवर भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष पंचनाम्यांस सुरवात झाली.  प्रशासनाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणानुसार महागाव तालुक्‍यातील ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु, प्रत्यक्षात ४८ हजार हेक्‍टवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सध्या महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गावपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. परंतु, अधुनमधून येणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांचे काम प्रभावीत होत आहे. या आठवड्यात ते पूर्णत्वास जाईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्‍त केला जात आहे. असे असले तरी पंचनाम्यांची गती मंदावल्याचे चित्र सर्वदूर अनुभवता येते.  सुरुवातीला हे काम अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात आला होता. परंतू, आठवडा लोटल्यानंतरही ते झाले नाही. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. नुकसानभरपाईसाठी आधी ऑनलाइन पध्दतीत कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर पंचनाम्यांसाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी शोधताना देखील शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. रब्बी हंगामाची तयारी करण्याऐवजी पंचनामे करण्यासाठी महसूल व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमागे धावाधाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT