वादळ नुकसान
वादळ नुकसान  
मुख्य बातम्या

‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीर

वृत्तसेवा

भुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल चक्रीवादळाचा शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फटका बसला. त्यामुळे ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी निविष्ठांवर आणि मत्स्योत्पादकांना मस्त्यशेती आणि मत्स्यबीजशेती दुरुस्तीसाठी तर मच्छीमारांना बोटी आणि जाळ्यांचे झालेले नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केली आहे. प्रचंड नुकसानीने अडचणीत आलेल्या शेतकरी आणि मच्छीमारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.  नुकत्याच आलेल्या बुलबुल चक्रीवादळाचा ओडिशातील जगजितसिंहपूर, केंद्रापाडा, भद्रक, बालासोर, मयूरभंज आणि जजपूर या जिल्ह्यांना जोरदार फटका बसला. या सहा जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. हजारो पशुधनाचा मृत्यू झाला असून यात दुभत्या जनावरांचा समावेश लक्षणीय आहे. चक्रीवादळाचा थेट परिणाम हा मच्छीमारांवर झाला आहे. मच्छीमारांच्या बोटी आणि मासेमारी जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मस्त्यशेतीला या जोरदार वादळाचा दणका बसला. पुरामुळे मत्स्य तळे वाहणे, बांध फुटणे, मत्स्यबीज आणि मासे पुरात वाहून जाणे आदी कारणांमुळे मत्स्यशेतीचे मोठे नुकसान झाले. राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना थेट वादळाचा फटका बसल्याने सरकारने राज्यातील अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी निविष्ठांवर अनुदान जाहीर केले आहे. पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे. तर मच्छीमारांना बोटी आणि मासेमारी जाळ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केली. मत्स्यशेतीचेही नुकसान झाल्याने मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर केली.  असे आहे निविष्ठा अनुदान

  •   अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना लाभ
  •   ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानीचा समावेश 
  •   दुष्काळी किंवा कोरवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये
  •   सिंचनाची सुविधा असलेल्या शेतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये
  •   सर्व बारमाही पिकासांठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये
  •   प्रभावित भागातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अल्प कालावधीच्या कर्जाचे रुपांतर मध्यम कालावधीत करणार
  • मत्स्यशेती,मच्छीमारांसाठी मदत

  •   बोटींच्या अंशतः नुकसानीसाठी ४ हजार १०० रुपये
  •   मासेमारी जाळीच्या अंशतः नुकसानीसाठी २ हजार १०० रुपये
  •   बोटीच्या पूर्ण नुकसानीसाठी ९ हजार ६०० रुपये
  •   मासेमारी जाळींच्या नुकसानीसाठी २ हजार ६०० रुपये
  •   मत्स्यशेतीच्या पुनर्निर्मितीसाठी प्रतिहेक्टरी १२ हजार २०० रुपये
  •   नुकसानग्रस्त मत्स्यबीज शेतीच्या निविष्ठा अनुदानासाठी प्रतिहेक्टरी ८ हजार  २०० रुपये 
  • प्रत्येकी पशुधनासाठी मदत पुढीलप्रमाणे (कंसात पशुधन मर्यादा) ३० हजार दुधाळ गायी, म्हशी २५ हजार भाकड जनावरे (तीनपर्यंत) १६ हजार वासरे ३ हजार  शेळ्या, मेंढ्या (३० पर्यंत) ५० रुपये (प्रती पक्षी) पोल्ट्री (५० हजारांपर्यंत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT