दूधसंघ बैठक
दूधसंघ बैठक 
मुख्य बातम्या

राज्यातील सहकारी दूध संघांची रविवारी अकलूजला बैठक

Sudarshan Sutaar

सोलापूर  ः राज्यातील सहकारी दूध संघांच्या अडचणी व त्यावरील उपायांवर चर्चा करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील दूध संघांची येत्या रविवारी (ता.२४) अकलूजला बैठक बोलावली आहे. रविवारी शिवामृत दूध संस्थेच्या सभागृहात ही बैठक होईल.बैठकीसाठी राज्यातील सगळ्या सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या बैठकीचा उद्देश सांगताना खासदार मोहिते पाटील म्हणाले, "शासनाने दिलेल्या दूध दरापेक्षा दूध संस्थांकडून कमी दर दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच सहकारी दूध संघही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. नुकतीच पुण्यात सहकारी व खासगी दूध संघाची बैठक झाली. या बैठकीत शासनाने ठरवलेला २७ रुपयांचा दर कमी करुन २२ रुपये करावा, अशी मागणी करण्यात आली. पण आपण त्यास विरोध केला. तसेच खासगी दूध संघ दूध विक्रीऐवजी दूध पावडर तयार करतात.

आता दूधपावडरचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कमी होत आहेत. त्यामुळे दुधाचा दर कमी करण्याची मागणी खासगी संघ करत आहेत. त्यांच्यावर दूध दराबाबत कोणतेही बंधन नाही, त्या तुलनेत सहकारी दूध संघाला बंधने आहेत. शिवाय खासगी दूध संघ कमी दरात दूध खरेदी करू शकतात. त्यातच काही सहकारी दूध संघांच्या कामाची चौकशी सुरू आहे. अशा अनेक अडचणी आज सहकारी दूध संघासमोर आहे. त्यावर या बैठकीत चर्चा होईल, असेही मोहिते पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT