मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

चाकण येथे आंदोलनाला हिंसक वळण

टीम अॅग्रोवन

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी चाकण (ता. खेड) येथे काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या वेळी आंदाेलकांनी वाहनांवर दगडफेक करीत जाळपाेळ केली. यामध्ये सुमारे ३० वाहनांचे नुकसान झाले आहे. दगडफेकीत पाेलीस अधिकारी आणि नागरिक जखमी झाले आहेत. आंदाेलकांनी पाेलिस ठाण्यावरदेखील हल्ला करीत आवारातील वाहनांची ताेडफोड केली. या वेळी पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात जमावबंदी आदेश लागू केला.

सोमवारी सकाळी माेर्चा झाल्यानंतर आंदाेलन उग्र झाले. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली हाेती. यामुळे प्रवाशांचे माेठे हाल झाले. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या जाळपाेळीमुळे माेठ्या प्रमाणावर आगीचे लाेट पसरले हाेते आंदोलकांच्या दगडफेकीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, आंदाेलकांना शांत करण्यासाठी आंबेठाण येथे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी आंदाेलकांशी संवाद साधत, मी विश्‍वास नांगरे पाटील आहे. माझ्यावर विश्‍वास ठेवा. कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता नागरिकांनी शांतता बाळगावी. लवकरच मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणार असून, आरक्षणाचा विषय मार्गी लागेल. त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT