कर्मचाऱ्यांच्या संपाला वऱ्हाडात मोठा प्रतिसाद
कर्मचाऱ्यांच्या संपाला वऱ्हाडात मोठा प्रतिसाद 
मुख्य बातम्या

कर्मचाऱ्यांच्या संपाला वऱ्हाडात मोठा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

अकोला : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक अाणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पहिल्याच दिवशी वऱ्हाडात मोठा प्रतिसाद मिळाला. या विभागातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. सर्वच शासकीय यंत्रणामधील विविध संघटनांनी संपाला पाठिंबासुद्धा दिला आहे.

कामगार व कर्मचारी विराेधी धाेरणांच्या माध्यमातून प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा संघटनांचा अारोप आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी व कामगारांमध्ये असंताेष वाढत अाहे. अापल्या मागण्यांची सरकारला जाणीव करून देण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी, जिल्हा परिषद महासंघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व इतर संघटनांनी मंगळवार (ता. ४) पासून गुरुवारपर्यंत (ता. ९) संप पुकारला आहे.

कृषी खात्याचे १८ हजारांवर कर्मचारी सहभागी राज्यात कार्यरत कृषी खात्यातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, लिपिक, ट्रेसर असे विविध कर्मचारी मिळून सुमारे १८ हजारांवर कर्मचारी सहभागी झाले अाहेत. सध्या राज्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दर दिवसाला वाढत अाहे. शिवाय इतर पिकांवरील किडींचे निरीक्षण, शेतकऱ्यांना सल्ले देण्याचे काम क्रॉपसॅपमधून कृषी सहायक करीत असतात. अाता सर्व कृषी सहायक संपावर असल्याने तीन दिवस निरीक्षण, सर्वेक्षणाचे काम ठप्प राहणार अाहे. शिवाय दुसरा शनिवार, रविवार असल्याने अाता अाठवडाभरच कामकाजावर परिणाम होणाची शक्यता अाहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • सातव्या वेतन आयोगाचे लाभ द्यावा
  • अंशदायी पेन्शन योजना रद्द करीत जुनी पेन्शन योजना अमलात अाणावी
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे,
  • रिक्त पदे तात्काळ भरावी.
  • राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी
  • १ जानेवारी २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता, तसेच थकबाकी देण्यात यावी
  • सेवानिवृत्तीचे वयोमान ६० वर्षे करावे
  • सरकारी कामकाजातील खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे
  • विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या तत्त्वावर आणण्यात यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT