अकोला : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता वीज जोडण्या तोडण्याचा सपाटा लावला आहे. याला विरोध म्हणून शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.१६) वीजबिल सोक्षमोक्ष आंदोलन जाहीर केले आहे.
अडगाव बुद्रुक येथे झालेल्या आंदोलनामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत अवास्तव वीजबिल विषयांवर चर्चा करण्यात आली. शेती पंपाची वीज जोडणी पाच महिने बंद असते. हे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केले. मिळणारी वीज ही सुरळीत नसल्यामुळे आणि विद्युतभार सतत कमी जास्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी जळतात. मोटर जळाल्याचा भुर्दंड आणि शेती पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. शेतकरी दुरुस्त केलेले बिल भरण्यास तयार असताना सुद्धा बिल दुरुस्तीस असमर्थ असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलेले बिल हे वीज वापरण्याच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे पुराव्यानिशी महावितरणने दिलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट करण्यात आले. अशी आकडेवारी शेतकरी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आली. त्यामुळे बिल दुरुस्त करून द्यावे व नंतर आम्ही त्यावर विचार करू, अन्यथा शेतकऱ्यांचे वीज जोडणी कापल्यास शेतकरी संघटना घटनास्थळी पोहोचून त्यांना विरोध करेल. वीज कापू देणार नाही, असा इशारा ललित बहाळे यांनी यावेळी दिला.
आंदोलनात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सतीश देशमुख , शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, अशोक घाटे, महावितरणचे उपविभागीय अधिकारी ऊइके, हिवरखेडचे ठाणेदार चव्हाण चर्चेत सहभागी होते. या वेळी तालुका प्रमुख निलेश नेमाडे, दिनेश गिर्हे, अमोल मसुरकर, गोपाल चांडक, मकसूद मुल्लाजी, मंगेश रेळे, दिनेश देऊळकार, संजय ढोकणे, अस्लम उल्ला, इम्रान खान, मोहन खिरोडकार, मंगेश रेळे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.