Sindhudurg Weather: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी सुरूच आहेत. गुरुवारी (ता. २) सकाळपासून काही भागांत पावसाला सुरुवात झाली. ढगाळ हवामानामुळे संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..जिल्ह्यात २६ मार्चपासून पावसाच्या सरी पडत आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळपासून सर्वत्र पावसाचे वातावरण झाले. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली. रात्री विजांचा गडगडाट सुरू होता; परंतु पाऊस झाला नव्हता. मात्र आज पहाटेपासूनच पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले. .Sindhudurg Weather: सिंधुदुर्गात सकाळी धुके, दुपारी कडक ऊन.सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्या सरी बरसल्या. आंबा काढणी सुरू असताना देवगड तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने आंबा बागायतदारांची तारांबळ उडाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्यांच्या काही भागांत देखील पावसाच्या सरी झाल्या. उर्वरित जिल्ह्यात देखील पावसाचे वातावरण आहे. आंबा, काजू बागायतदार सतत संकटांत सापडत आहेत..Sindhudurg Weather Update : पहाटे धुके, दुपारी ऊन अन् सायकांळी सरी.परिपक्व आंब्याची काढणी करासिंधुदुर्गात ४ एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी परिपक्व आंब्याची काढणी करावी..याशिवाय काजू बागेत जमिनीवर पडलेली फळे तातडीने जमा करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असा सल्ला मुळदे संशोधन केंद्राकडून आंबा, काजू बागायतदारांना देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.