‘Robbing grape growers Will teach traders a lesson '
‘Robbing grape growers Will teach traders a lesson ' 
मुख्य बातम्या

‘द्राक्ष उत्पादकांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार’

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अडचणी, सध्या दरात झालेली घसरण, यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे. खर्च करूनही मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लुट सुरू आहे. शेतकरी संघटित नसल्याने गैरफायदा घेतला जात आहे. येथून पुढे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना धडा शिकवील’’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला.

जगताप म्हणाले, ‘‘निर्यातदार मनमानी करून कमी भाव शेतकऱ्यांना देत आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर होत आहे. द्राक्ष मण्याची फुगवण जास्त, तर चांगला भाव हा चुकीचा समज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्यातदारांनीच निर्माण केला. म्हणून संजीवकांचा वापर वाढला. याला मात्र निर्यातदार शेतकऱ्यांना संपूर्ण दोषी ठरवत आहेत. मागील वर्षी अनेक निर्यातदारांनी शेतकऱ्यांना ठरलेल्या भावाप्रमाणे पैसे दिले नाहीत. शिवार खरेदीवर शासनाने नियंत्रण आणणे व या व्यवहाराला हमी देणे गरजेचे आहे.’’

‘‘नवीन कृषी कायद्यांचे काही निर्यातदार समर्थन करत आहेत. मग त्या कृषी कायद्यांनुसार २४ ते ४८ तासांत शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत?, द्राक्ष तोडून आणल्यानंतर निर्यातदाराने माल परत केला. हे संतापजनक आहे. असे प्रकार घडल्यास त्या कंपनीची वीटसुद्धा जागेवर ठेवणार नाही,’’ असे जगताप म्हणाले.

‘आता संघटितपणे संघर्ष’

‘‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रक्त सांडून न्याय मिळवलाय. त्या प्रमाणे द्राक्ष उत्पादकांना सुद्धा संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय न्याय पदरात पडणार नाही. या साठी सर्वांनी संघटित व्हावे, तरच द्राक्ष शेती वाचेल. या संघर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी खांद्याला खांदा लाऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. पण द्राक्ष उत्पादकांनीही जागृत व्हावे’’, असे आवाहन जगताप यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT