‘KVK’ is a beekeeping entrepreneur Create: Vice Chancellor Dr. Dhavan
‘KVK’ is a beekeeping entrepreneur Create: Vice Chancellor Dr. Dhavan 
मुख्य बातम्या

‘केव्हिकें’नी मधमाशीपालनातील उद्योजक निर्माण करावे ः कुलगुरू डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी मधमाशी पालनाच्या प्रशिक्षणाद्वारे मधमाशीपालन या शेतीपुरक व्यवसायामधील उद्योजक निर्माण करावे’’, असे आवाहन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभाग आणि मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांतील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ यांच्यातर्फे जागतिक मधमाशी दिनानिमत्त बुधवारी (ता.२०) आयोजित ऑनलाइन चर्चासत्रात डॉ. ढवण बोलत होते. 

शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसकर यांचा प्रमुख सहभाग होता. कृषी किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जगदीश जहागीरदार, प्रगतिशील मधमाशी संगोपक दिनकर पाटील आदी सहभागी झाले होते. 

डॉ. ढवण म्‍हणाले,‘‘मधमाशांचे पिकातील परागीभवनाच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. मधमाशी पालन या शेतीपुरक व्यवसायातून उद्योजक निर्माण होण्याची गरज आहे.’’  मधुमक्षिका पालन एक कृषिपुरक उद्योग या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मधमाशाच्या विविध प्रजाती बददल माहिती दिली. दिनकर पाटील यांनी चाकूर येथून चर्चासत्रात सहभाग नोंदवून मधमाशी संगोपन, मध काढणी, विविध प्रजातीचा मध आदींबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. 

प्रास्ताविक डॉ. बंटेवाड यांनी केले. सूत्रसंचालन खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. अजय मिटकरी यांनी केले. मांजरा ‘केव्हीके’चे विषय विशेषज्ञ डॉ. संदीप देशमुख यांनी आभार मानले. कृषी कीटकशास्त्र विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धीरज कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. फारिया खान, डॉ. श्रध्दा धुरगुडे आदीसह विभागातील विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT