Zero response to the purchase of tur in Khandesh
Zero response to the purchase of tur in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात तुरीच्या खरेदीला शून्य प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसाठी यंदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविली. परंतु, तूर खरेदीला कुठेही प्रतिसाद मिळालेला नाही. खानदेशातील २४ खरेदी केंद्रांमध्ये कुठेही खरेदी होऊ शकलेली नाही. कारण, बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर आहे. त्यामुळे शासकीय केंद्रात आवकच झाली नाही. 

तूर विक्रीसंबंधी ९०० शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात नोंदणी केली होती. १४ खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात निश्चित केले होते. तर धुळे व नंदुरबारात मिळून १० केंद्र निश्चित केले होते. धुळे व नंदुरबारातही सुमारे ३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. परंतु, तूर विक्रीसाठी कुणी शेतकरी खरेदी केंद्रात आला नाही.

तुरीचा हमीभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. तर बाजारातील दर किमान ६२००, साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. सुरवातीपासून तूर दर स्थिर असल्याने शासकीय खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती मिळाली. 

जळगावात पुढील आठवड्यात हरभरा खरेदी

जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठीदेखील १४ केंद्र निश्चित केले आहेत. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. २६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु खरेदी सुरू झालेली नाही. बाजारात देशी, देशी सुधारित वाणांच्या हरभऱ्याचे दर ४६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर हमीभाव ५१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. यामुळे हरभऱ्याची शासकीय खरेदीदेखील किती होईल, याबाबत प्रश्न आहे. 

तुरीची कुठलीही शासकीय खरेदी जळगाव जिल्ह्यातील १४ केंद्रांमध्ये झाली नाही. कारण बाजारात हमीभावापेक्षा अधिकचे दर तुरीला मिळाले. हरभरा खरेदी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते. - गजानन मगरे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT