पुणे ः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.७) झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिराेळे, श्रीरंग बारणे, महापाैर मुक्ता
पुणे ः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.७) झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिराेळे, श्रीरंग बारणे, महापाैर मुक्ता  
मुख्य बातम्या

राज्यभरात झिरो पेंडन्सी उपक्रम राबविणार ः मुख्यमंत्री

गणेश कोरे
पुणे ः शासकीय कार्यालयांतील कामांचा निपटारा वेगाने हाेण्यासाठी संपूर्ण राज्यभरात झिरो पेंडन्सी राबविणार अाहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध केली जाईल. यानंतर विविध विभागांमध्ये झिराे पेंडन्सीची स्पर्धा घेतली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ७) केली.
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘शासकीय कार्यालयांतील झिराे पेंडन्सीचा आदर्श तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी घालून दिला आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये झिरो पेंडन्सीच्या माध्यमातून लाखो प्रकरणे निपटारत निघत असून, विविध विभागांमध्ये झिराे पेंडन्सी उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येईल.’’
 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘समाजाची कामे तत्काळ हाेण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गतीने आणि संवदेनशीलपणे काम करण्याची गरज आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT