Yellow mosaic infestation on soybeans
Yellow mosaic infestation on soybeans 
मुख्य बातम्या

सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

सेलू, जि. वर्धा : यावर्षी आजवर झालेल्या पावसाच्या परिणामी सोयाबीन पीक बंपर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.  

सेलू तालुक्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढीस लागले आहे. समाधानकारक पावसाच्या परिणामी उत्पादकता आणि उत्पन्न चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु कोटंबा, विटाळा, धपकी शिवारात काही शेतकऱ्यांच्या फुल तर काही शेतकऱ्यांकडे शेंग धारणावस्थेत असलेले पीक पिवळे पडू लागले आहे. पिकावर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोटंबा विटाळा शिवारात भाऊराव सारोकर, काशिनाथ लोणकर, महादेव सारोकर, शंकर डोंगरे, सचिन झिले, विकी कांबळे या शेतकऱ्यांचे तीस एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिवळे पडून करपायला सुरुवात झाली आहे. सोयाबीन फुलोरा आणि काही भागात शेंगधारणा अवस्थेत असताना हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.

संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे झाडाची मूळ बराच काळ काम पाण्यात राहिल्याने विविध प्रकारचे कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. पीक पिवळे पडण्याचा प्रकार पिवळा मोझॕक आहे. तरीसुद्धा शेताची पाहणी केल्याशिवाय  स्पष्ट सांगता येणार नाही. - राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू

आमच्या शेतातील सोयाबीनला फुलधारणा चांगली झाली होती. आता शेंगा सुद्धा लागण्या सुरुवात झाली होती. परंतु दोन-तीन दिवसांपासून हिरवेगार सोयाबीन पिवळे पडून वाळायला लागले आहे.  कृषी खात्याने पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करावे. - भाऊराव सारोकर, शेतकरी कोटंबा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT