नाशिकला गुलाबी बोंड अळी, लष्करी अळी व्यवस्थापनावर कार्यशाळा संपन्न
नाशिकला गुलाबी बोंड अळी, लष्करी अळी व्यवस्थापनावर कार्यशाळा संपन्न 
मुख्य बातम्या

नाशिकला गुलाबी बोंड अळी, लष्करी अळी व्यवस्थापनावर कार्यशाळा संपन्न

टीम अॅग्रोवन

नाशिक : कृषी विभागाच्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, येवला व महिको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी व मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापन कार्यशाळा (ता. २) येवला तालुक्यातील बोकटे येथे संपन्न झाली. येवला तालुक्यात खरीप हंगामात मका व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या अनुषंगाने आगामी हंगामात रोगाचा प्रादुर्भाव टाळता यावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने होणारे नुकसान, बिज प्रक्रिया व व्यवस्थापनाबद्दल कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर कापूसतज्ज्ञ दत्ता इथापे यांनी मार्गदर्शन केले. आगामी हंगामात मका व कापूस पिकांची लागवड करताना कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंदर्भाने तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांनी कृषी विभागाची भूमिका मांडली. या कार्यक्रमासाठी सुहास दाभाडे, मविप्र संचालक रायभान काळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पोलिस पाटील सुरेश दाभाडे, उपसरपंच प्रताप दाभाडे यांच्यासह येवला तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ भोंडवे यांनी केले, तर आभार सागर साळुंके यांनी मानले. या प्रसंगी मागील हंगामात प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कपाशी व मका यांचे विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT