The work of 'Tembu' has been kept on the ghats of the kawathemahakal taluka
The work of 'Tembu' has been kept on the ghats of the kawathemahakal taluka  
मुख्य बातम्या

कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर वर्षापासून रखडले ‘टेंभू’चे काम 

टीम अॅग्रोवन

घाटनाद्रे, जि. सांगली : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यास वरदान ठरणारी टेंभू योजना सुमारे दोन वर्षांपासून रखडली आहे. या योजनेचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

टेंभू उपसा सिंचन योजना टप्पा क्र.५ अंतर्गत बुडलेंगरे येथून पाणी उचलून तांबखडी, खानापूर, पळशी, घाटनाद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापूर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूरसह परिसरातील शेतीला पाणी देण्यासाठी ही योजना प्रस्तावित आहे. योजनेच्या कामाचे घाटनाद्रे व डोंगरसोनी येथे भूमिपूजनही झाले आहे. तत्कालीन अधीक्षक अभियंता गुणाले व कार्यकारी अभियंता कडूसकर यांनी मे २०१९ पर्यंत योजना चालू होईल, असे आश्वासन दिले होते.  

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. ५०० एकरांच्या आउटलेटऐवजी १०० एकरांवर औटलेट सोडावे, ओढपात्राऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देण्याबाबत, ६०० एमएमऐवजी १२०० एमएम पाइप वापरण्याबाबत चर्चा झाली होती. यासह अन्य मागण्या व योजनेचे काम लवकर सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आजअखेर योजनेचे काम बंद आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. 

ही रखडलेली योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी नुकतीच कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व जलसंधारण मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT