युवकाने बनविले अंडी उबवणी यंत्र
युवकाने बनविले अंडी उबवणी यंत्र 
मुख्य बातम्या

‘म्हैसळ’च्या दुरुस्ती कामांना गती

टीम अॅग्रोवन

सांगली ः म्हैसाळ योजनेचे आवर्तन थांबताच देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली. कालव्यांची गळती, पंपांची दुरुस्ती, पाण्याचे मीटर बसवणे अशी कामे हाती घेतली आहेत.  आठ ऑक्‍टोबरला सुरू झालेले आवर्तन १४४ दिवसांपर्यंत लांबल्याने देखभाल व दुरुस्तीची कामे रखडली. कामांच्या निविदा व ठेकेदार निश्‍चित झाले, पण आवर्तन थांबल्याशिवाय कामे सुरू करता येत नव्हती. गेल्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील पंपांत बिघाड झाल्याने उपसा सक्तीने थांबवावा लागला. त्यानंतर कामे तातडीने सुरू करण्यात आली. बेडग, आरग, सलगरे या मुख्य कालव्यांची गळती काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले. अनेक ठिकाणी अस्तरीकरण निघाल्याने पाणी वाहून जात होते. आरग, बेडग आणि लिंगनूर कालव्यांचे अस्तरीकरण काही ठिकाणी नव्याने केले जात आहे. या कालव्यांच्या गेटमधून पाणी वितरिकांत सोडले जाते. त्याचे मोजमाप करता येत नाही. त्यामुळे योग्य पाणीपट्टीही आकारता येत नाही. त्यावर उपाय म्हणून येथे पाणी मोजणारी मीटर्स बसवली जात आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेल्या प्रत्येक लिटर पाण्याचे पैसे आता द्यावे लागतील.  कवठेमहांकाळ, खंडेराजुरी कालव्यांवरही मीटर बसवले जाणार आहेत. कवठेमहांकाळ कालव्याचे अस्तरीकरण केले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT