ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको  Without giving usbile No threshing license
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको  Without giving usbile No threshing license 
मुख्य बातम्या

ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको : स्वाभिमानी शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे मागील वर्षाच्या गाळप हंगामातील ऊसबिले थकीत आहेत. त्यामुळे मागील वर्षाची थकीत पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता.२४) पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून केली.  जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) संपूर्ण दिली आहेत, अशाच साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा. काही कारखाने करार करून चार टप्प्यांत एफआरपी देणार असल्याचे सांगत आहेत. काही कारखानदार एफआरपी दिल्याची खोटी माहिती देत आहेत, अशा सर्व कारखान्यांची सखोल चौकशी करावी, शेतकरी व शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई करावी. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी सर्वसाधारण सभेमधून काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या सभासदांचे सभासदत्व कायम राहावे. काही कारखानदार काटा मारतात, रिकव्हरी कमी दाखवितात. या प्रकरणांची चौकशी करावी, कारखान्यांच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन घ्याव्यात, आदी मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले.  या वेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजन शेख, अजित बोरकर, अमर इंगळे, तानाजी शिंदे, अतुल पिसे उपस्थित होते. 

पंढरपुरात बैठक घेऊ  जे साखर कारखाने १५ ऑक्टोबरच्या आधी पूर्ण एफआरपी देतील, त्यांनाच गाळप परवाना देऊ. तसेच इतर विषयांसाठी लवकरच पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची बैठक घेण्याचे आश्‍वासनही साखर आयुक्त गायकवाड यांनी दिले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT