माण येथे वीस छावण्या सुरू करणार : पालकमंत्री विजय शिवतारे
माण येथे वीस छावण्या सुरू करणार : पालकमंत्री विजय शिवतारे  
मुख्य बातम्या

माण येथे वीस छावण्या सुरू करणार : पालकमंत्री विजय शिवतारे

टीम अॅग्रोवन

दहिवडी, जि. सातारा : ‘‘माणमध्ये एक्कावन पैकी एकतीस चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या अठ्ठेचाळीस तासांत सुरू करणार आहोत. पालकमंत्री म्हणून छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचे ते मी बघतो. कॅमेरे लावणे महत्त्वाचे नसून जनावरे वाचविणे महत्त्वाचे आहे’’, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. 

शिवतारे यांनी पिंगळी बुद्रुक (ता. माण) येथे चारा छावणी पाहणी करून पशुपालकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी व चारा छावणी चालकांशी संवाद साधताना ते बोलत होते. आमदार जयकुमार गोरे, हरणाई सूत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, भाजपचे रणधीर जाधव, शिवसेनेचे अनिल सुभेदार, रासपचे बबन विरकर, गोडसे, केशवराव वणवे, जिल्हा परिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. कैलास शिंदे, जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डाॅ. अंकुश परिहार, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार, तहसीलदार बाई माने, तहसीलदार, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गट विकास अधिकारी काळे आदी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘‘नवीन दहा गावांसाठी सक्षम संस्थांना बोलावून चारा छावण्या सुरू करण्यास सांगितले जाईल. जनावरांना प्रथम प्राधान्य द्या, छावणी सुरू होणे ही शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरू करता येतील ते पहा. जे चारा छावणी चालक चार दिवसांत चारा छावणी सुरू करणार नाहीत, त्यांची परवानगी काढून घेण्यात येईल.’’

‘‘छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनुदान देण्यात येईल. जनावरांचा खर्च छावणी चालकांवर येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल,’’ असेही शिवतारे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT