The weekly market in Akola has been resumed from April 5
The weekly market in Akola has been resumed from April 5 
मुख्य बातम्या

अकोल्यात ५ एप्रिलपासून आठवडी बाजार पूर्ववत

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद असल्याचा फटका थेट शेतमाल विक्रीला बसला असून, आता प्रशासनाने परवानगी दिल्याने दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत नवीन आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार, जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजार शुक्रवार (ता. ५) पासून खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब करून सुरू करण्‍यात येत असल्याचे म्हटले आहे. यासाठी नियमावलीसुद्धा जाहीर केली आहे. त्यात प्रामुख्याने आठवडी बाजारामध्‍ये व्‍यवसाय करणारे व्यावसायिक, दुकानदार, कामगार यांनी आपली दुकाने बाजारामध्‍ये लावण्‍यापूर्वी कोविड चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

ज्‍या व्यावसायिक, दुकानदार, कामगारांची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली असेल अशाच व्यावसायिकांना त्‍यांची दुकाने आठवडी बाजारामध्‍ये लावता येणार आहेत. चाचणी न करणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांवर दंडनीय कारवाई करण्‍यात येईल. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असल्‍याशिवाय बाजारामध्‍ये दुकान लावता येणार नाही. बाजारामध्‍ये दुकानाची व व्‍यवसायाची बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या (Physical Distancing) नियमानुसार असावी.

व्यावसायिक दुकाने सायंकाळी सातपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्‍या सेवाअंतर्गत असलेली प्रतिष्‍ठाने, दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र सर्व संबंधित व्यावसायिक, दुकानदार तसेच कामगार यांनी त्‍यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य केले आहे. खाद्यगृहे, रेस्‍टॉरंट यांचे किचन व स्‍वयंपाकगृह हे सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत सुरू राहतील. अशा खाद्यगृह, रेस्‍टॉरंट यांना फक्‍त घरपोच सेवा देण्‍याकरिता परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागामध्‍ये रात्रीचे आठ वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची जमावबंदी व संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT