अमरावतीत आठवडाभर  लॉकडाऊन जाहीर A week in Amravati Lockdown announced
अमरावतीत आठवडाभर  लॉकडाऊन जाहीर A week in Amravati Lockdown announced 
मुख्य बातम्या

अमरावतीत आठवडाभर लॉकडाऊन जाहीर 

टीम अॅग्रोवन

अमरावती : मुंबईनंतर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती तसेच अचलपूर शहरामध्ये एका आठवड्यासाठी कडकडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २२) रात्री आठपासून लॉकडाउन लावण्यात आले. एक आठवडाभर जीवनावश्यक बाबी वगळता सर्व प्रतिष्ठाने, व्यापार, व्यवसाय, लग्न समारंभ बंद राहणार आहेत. 

वारंवार आवाहन करून सुद्धा अमरावतीकरांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाइलाजास्तव लॉकडाउनचा निर्णय जाहीर करावा लागला, असे पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या संदर्भात त्यांनी रविवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. 

पालकमंत्री म्हणाल्या, ‘‘अमरावती तसेच अचलपूरमध्ये सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळून येत असल्याने हे दोन्ही शहर कंन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोरोनाची झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती उपलब्ध नाही. नागरिकांची तारांबळ उडता कामा नये, यासाठी सोमवारी दिवसभर अनलॉक राहणार असून, रात्री आठनंतर लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.’’ 

अमरावतीचा मृत्यूदर १.६ टक्के  अमरावतीमध्ये कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असले तरी मृत्यूदर मात्र राज्याइतकाच म्हणजे १.६ टक्के आहे. ही दिलासादायक बाब आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने दाखल आहेत. १४०० बेड्सची क्षमता असली तरी आणखी २०० बेड्स नव्याने वाढविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

SCROLL FOR NEXT