मुख्य बातम्या

किमान तापमानात चढ-उतार

टीम अॅग्रोवन

पुणे : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात किमान तापमानात घट झाली आहे. परंतु, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित भागांत थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी (ता. 21) सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे 8.9 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात गुरुवारी (ता. 21) आकाश अंशतः ढगाळ होते. आजही पुणे परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. येत्या रविवारपयींत (ता. 24) पुणे परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, त्यानंतर हवामान ढगाळ राहील.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आहे. किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घट झाली आहे. विदर्भानंतर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही थंडी वाढत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा चांगला जोर आहे.

गुरुवारी (ता. 21) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) 20.0 (-1), अलिबाग 18.2, रत्नागिरी 18.8 (-1), डहाणू 17.7 (2), भिरा 15.0 (-2), पुणे 10.5 (1), जळगाव 10.0 (-1), कोल्हापूर 15.4 (1), महाबळेश्वर 13.6, मालेगाव 11.8, नाशिक 9.2.2 (-1), सांगली 12.2 (-1), सातारा 11.8 (-1), सोलापूर 11.6 (-3), औरंगाबाद 11.0, ,परभणी 10.7 (-2), नांदेड 11.0 (-2), उस्मानाबाद 8.9, अकोला 11.3 (-2), अमरावती 12.6 (-2), बुलडाणा 13.6, चंद्रपूर 12.6, गोंदिया 10.2 (-4), नागपूर 12.0 (-1), वर्धा 10.6 (-3, यवतमाळ 13.0 (-3)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

SCROLL FOR NEXT