कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली
कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तर आणि ईशान्येकडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने कोकणाकडे थंड वारे वाहत आहे. मराठवाडा आणि विदर्भानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातही चांगलीच थंडी वाढली आहे. मंगळवारी (ता. 2) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महराष्ट्रातील निफाड येथे 8.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दिवसभर ऊन असले तरी थंडीच्या गारव्यामुळे हे ऊन सुखद दिलासा देऊन जात आहे. सायंकाळनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे सायंकाळपासून थोडी थोडी थंडी वाढत आहे. मात्र मध्यरात्रीपासून थंडीत वाढ होऊन पहाटेच्या थंडीमुळे किमान तापमानाचा पाराही घसरत आहे.

सध्या मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. मुंबईत 14.1 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद मंगळवारी (ता.2) सकाळी झाली. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागातही थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापामानात घट झाली असून, निफाड, नाशिक येथील किमान तापमान दहा अंशांच्या खाली उतरले आहे. महाबळेश्वर, सांगली येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. परंतु सरासरीच्या तुलनेत येथील किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार सुरू होते.

मराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वांत कमी म्हणजेच 8.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ उस्मानाबादमध्ये 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. औरंगाबाद, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी वाढले. विदर्भातील गोंदिया येथे 8.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. चंद्रपूर, गोंदिया येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले होते.

मंगळवारी (ता.2) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) 14.1 (-3), अलिबाग 16.7 (-1), रत्नागिरी 16.6 (-2), डहाणू 16.0 (-1), पुणे 10.8, जळगाव 10.2 (-1), कोल्हापूर 15.2 (1), महाबळेश्वर 12.8, मालेगाव 11.8 (1), नाशिक 8.2, निफाड 8.0, सांगली 13.3, सातारा 12.0 (-1), सोलापूर 13.0 (-2), औरंगाबाद 12.4 (2), परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 8.4, परभणी शहर 12.1 (-1), नांदेड 13.0 (1), उस्मानाबाद 9.4, अकोला 12.4 (-1), अमरावती 14.0, बुलडाणा 14.0, चंद्रपूर 11.2 (-2), गोंदिया 8.5 (-4), नागपूर 11.8, वाशीम 11.2, वर्धा 13.0 (1), यवतमाळ 14.4.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT