गारवा पुन्हा कमी; तापमान वाढू लागले !
गारवा पुन्हा कमी; तापमान वाढू लागले ! 
मुख्य बातम्या

गारवा पुन्हा कमी; तापमान वाढू लागले !

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील अनेक भागांत पहाटे हवेतील गारवा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे किमान तापमान वाढू लागले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागांतून थंडी गायब झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किंचित थंडी आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे येथे १४.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची वाढ झाली आहे.

गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. शनिवारपर्यंत गोव्यासह महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.

कोकणात कोरड्या हवामानामुळे किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही वाढ झाली आहे. राज्यातील रत्नागिरी येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढ होऊ कमाल तापमान ३६.८ अंशांवर पोचले आहे. भिरा येथे ४०.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे या भागांत किंचित थंडी आहे. मात्र खानदेशातील मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मराठवाड्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या वर गेला आहे. त्याचबरोबर कमाल तापमानातही वाढ झाली आहे. विदर्भातही थंडी गायब झाली आहे. सकाळपासून उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत.

मंगळवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१), अलिबाग २१.० (२), रत्नागिरी १८.९ (-१), डहाणू २१.७ (३), भिरा १८.५ (१), पुणे १४.४ (१), नगर १५.३, जळगाव १९.० (४), कोल्हापूर १७.६, महाबळेश्वर १८.६ (३), मालेगाव १८.२ (४), नाशिक १६.२ (३), निफाड १५.०, सांगली १६.१, सातारा १४.७ (-१), सोलापूर २०.३ (१), औरंगाबाद २०.० (५), उस्मानाबाद १४.९, परभणी शहर १७.९, नांदेड १८.० (१), अकोला २१.० (४), अमरावती २०.८ (३), बुलडाणा २१.० (३), चंद्रपूर २३.० (५), गोंदिया १६.५, नागपूर १७.०, वर्धा १९.० (२), यवतमाळ २२.४ (४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT