कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले
कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले 
मुख्य बातम्या

कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तर महाराष्ट्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागात हवामान कोरडे असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मंगळवारी (ता. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे 9.2 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. 16) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. येत्या शनिवार (ता. 20) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरात आकाश मुख्यत निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशापर्यंत वाढ झाली आहे. भिरामध्ये 20.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली. निफाडमध्ये 13.0 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील किमान तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली. परभणीतील कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये 13.5 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. गोंदियापाठोपाठ नागपूरमध्ये 10.4 अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

मंगळवारी (ता. 16) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) 21.3 (5), अलिबाग 21.8 (5), रत्नागिरी 21.2 (2), भिरा 20. 5 (5), डहाणू 21.8 (5), पुणे 18.0 (7), नगर 14.6 (2), जळगाव 14.4 (3), कोल्हापूर 21.4 (6), महाबळेश्वर 16.6 (3), मालेगाव 15.5 (5), नाशिक 14.0 (4), निफाड 13.0, सांगली 19.2 (5), सातारा 18.6 (5), सोलापूर 18.7 (3), औरंगाबाद 15.4 (4), परभणी (कृषी विद्यापीठ) 13.5, परभणी शहर 15.4 (1), नांदेड 14.5 (1), अकोला 15.0 (1), अमरावती 17.0 (3), बुलडाणा 16.4 (2), चंद्रपूर 13.2 (-2), गोंदिया 9.2 (-3), नागपूर 10.4 (-3), वर्धा 13.0 (4), यवतमाळ 17.4 (2)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT