राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामान
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामान 
मुख्य बातम्या

राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामान

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या २४ तासांत सर्वांत कमी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद ब्रह्मपुरी येथे झाली. पुढील चार दिवस बुधवार(ता. २०)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवार(ता. १६)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. तर गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे हाेते.

शनिवारपर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई २१.५, अलिबाग २०.८, रत्नागिरी २०.३, पणजी २१.६, डहाणू २०, भिरा १८.५, पुणे १५.२, नगर १४.५, जळगाव १६, काेल्हापूर १७.९, महाबळेश्‍वर १५.४, मालेगाव १७.५, नाशिक १४.८, सांगली १६.८, सातारा १४.९, साेलापूर १६.१, आैरंगाबाद १५.४, परभणी १६.८, अकाेला १७, अमरावती १६.२, बुलडाणा १७.६, ब्रह्मपुरी १२.८, चंद्रपूर १६.२, गाेंदिया १५, नागपूर १३.६, वाशीम १६, वर्धा १४, यवतमाळ १७.४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT