Watermelon price improvement in Khandesh
Watermelon price improvement in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात कलिंगडाच्या दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात कलिंगडाची आवक घटत असून, दरात सुधारणा होत आहे. रमजान महिन्यामुळे उठाव चांगला असून, शेतकऱ्यांना जागेवरच ७ ते ८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. 

खानदेशात बहुसंख्य शेतकऱ्यांनी एप्रिल व एप्रिलच्या अखेरपर्यंत काढणीला येईल, यानुसार कलिंगड लागवडीचे नियोजन केले होते. लॉकडाऊनमुळे २० ते २२ एप्रिलपर्यंत कलिंगडाच्या दरात फारशी सुधारणा दिसत नव्हती. परंतु २४-२५ एप्रिलपासून दरात सुधारणा होवू लागली. मार्चच्या अखेरपासून कलिंगडाची आवक वाढत होती. खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी अधिक केली जाते. परंतु लॉकडाऊनमुळे शिवार खरेदी अल्प स्वरुपात झाली. 

या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना कलिंगड पिकात आर्थिक फटका बसला असून, खर्च निघेल एवढाच पैसा पिकात मिळाला. एप्रिलच्या अखेरिस आवक कमी झाली. शिवाय रमजानमुळे दरात सुधारणा झाली. चार ते पाच किलो वजनाच्या फळांना थेट जागेवर आठ ते नऊ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागातून मध्य प्रदेश, गुजरातमधील खरेदीदार मध्यस्थांतर्फे कलिंगडाचा पुरवठा करून घेत आहेत. 

काही शेतकरी थेट शहरात विक्री करीत असून, १५ रुपये प्रतिकिलोचा दर त्यांना मिळत आहे. कलिंगडाची अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकात आंतरपीक म्हणून लागवड केली होती. तर काही भागात मल्चींग, गादीवाफा तंत्रज्ञानाच्या वापरातून लागवड झाली होती. सर्वाधिक लागवड चोपडा, शिरपूर भागात झाली होती. तसेच जळगाव तालुक्‍यातही अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली होती. बाजार समितीमध्ये कलिंगडाची आवक नगण्य आहे. थेट शिवार खरेदी सुरू आहे. पुढील आठ ते १० दिवसांत कलिंगडाचा पुरवठा आणखी कमी होईल, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT