watermelon
watermelon 
मुख्य बातम्या

कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीर

टीम अॅग्रोवन

अकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात मागील दोन-तीन वर्षांपासून कलिंगडाची शेती फायदेशीर फार्म्युला ठरत आहे. शेतकऱ्यांनी यावर्षात पावसाळ्यातही हे पीक घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. बेमोसमी लागवड करीत हे शेतकरी चांगले दर कलिगंडाला मिळवू लागले आहेत. सध्या काढणी होत असलेले कलिंगड या वर्षात सर्वाधिक २२०० रुपये क्विंटल दराने विक्री झाले आहे. कलिंगडाचे पीक हे ६५ ते ९० दिवस या कालावधीत काढणीला येते. साधारणतः उन्हाळ्यात कलिंगडाची लागवड केली जाते. त्यामुळे या हंगातील क्षेत्र हे सर्वाधिक राहत असते. शिरपूर जैन (जि. वाशीम) परिसरातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा खरिपात कलिंगडाची लागवड करण्याचे धाडस केले. त्यात यशही मिळाले.  या वर्षी २५ जुलै ते १५ आॅगस्ट या काळात शिरपूर जैन परिसरात ४० ते ४५ एकरात कलिंगडाची लागवड झाली होती. या वर्षी अति पाऊस झाल्याने उत्पादना फटका बसला. तरी एकरी १५ ते २० टनांचे उत्पादन मिळाले. सरासरी दर ११०० ते २२०० दरम्यान मिळाले. काढणीनंतर पुन्हा २५ एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान लागवड झाली. सध्या या प्लॉटमधून कलिंगडाची काढणी सुरू आहे. रविवारी (ता. १२) काढणी झालेल्या कलिंगडाला सर्वाधिक २२०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. या हंगामातील उत्पादन हे २० ते ३० टनांपर्यंत राहिलेले आहे. कमी कालावधीत येणाऱ्या या पिकाकडे शेतकऱ्यांना कल असून, बिगर मोसमी लागवड करीत असल्यामुळे अधिक दर मिळत आहेत. दिल्लीला गेले कलिंगड शिरपूर जैन भागातील कलिंगड प्रामुख्याने दिल्ली बाजारपेठेत गेले आहे. व्यापाऱ्यांनी थेट खरेदी करीत हा माल नेला. साधारणतः ११०० रुपयांपासून २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. या वर्षी ४४ गाड्या कलिंगड दिल्लीला गेले. शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी ५० हजारांपर्यंत खर्च लागतो. प्रतिक्रिया कलिंगडाचे पीक कमी दिवसामध्ये येते. यंदा पावसाळ्यात दीड एकरात लागवड केली होती. एकरी १२ टन उत्पादन झाले. या कलिंगडात १५०० रुपये क्विंटलला दर भेटला. त्यानंतर याच जागेवर नवरात्रीमध्ये पुन्हा कलिंगडाची लागवड केली. एकरात १८ टन उत्पादन झाले. १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आता त्या ठिकाणी खरबूज लागवड करणार आहे. -सुरेश गाभणे, कलिंगड उत्पादक, शिरपूर जैन, ता. मालेगाव, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT