The water from the Takari scheme reached the mudflats
The water from the Takari scheme reached the mudflats 
मुख्य बातम्या

ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचले

टीम अॅग्रोवन

सांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू असलेल्या यंदाच्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याच्या ७५ किलोमीटरवर चिखलगोठण (ता. खानापूर) मध्ये पोहोचले आहे. हे पाणी कालव्याच्या शेवटचे गाव सोनी-भोसे (ता. मिरज) पर्यंत सोडले जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली.

ताकारी योजनेच्या लाभ क्षेत्रात पाण्याची टंचाई लक्षात घेऊन योजनेच्या आवर्तनाचे नियोजन केले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने दुसरे आवर्तन बंद झाल्यानंतर आठच दिवसांनी म्हणजचे ९ मे पासून तिसरे आवर्तन सुरू केले. प्रारंभी कुंभारगाव ते वांगीपर्यंतच्या २२ किलोमीटर कालव्यावरील वितरिकांतून शेतीला पाणी देण्यात आले. नंतरच्या टप्प्यात प्रत्येकी २० ते २५ किलोमीटरच्या टप्प्यांत पाणी सोडून हे पाणी पंधरा दिवसांनी खानापूर तालुक्‍यात पोहोचले. दोन दिवसांपूर्वी ताकारीचे पाणी तासगाव तालुक्‍यातील चिखलगोठण गावाच्या पुढे आले आहे. आवर्तन सुरू असल्याने भूजलपातळी काहीशा प्रमाणात वाढली आहे.

कडेगाव, खानापूर, आणि तासगाव तालुक्‍यातील बहुतांश शेतीला आणि गावांना पाणी उपलब्ध होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येरळा नदी कोरडी होती. सध्या हे पाणी तासगाव तालुक्‍यात आल्याने नदीच्या पात्रात पाणी आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीला वेळेत पाणी मिळाले आहे. योजनेचे टप्पा क्रमांक एक साटपेवाडी बंधाऱ्यावरील आणि टप्पा क्रमांक दोन सागरेश्‍वमधील प्रत्येकी ११ पंप सुरु आहेत. मुख्य कालव्यातून हे पाणी १४४ किलोमीटरवर मिरज तालुक्‍यातील सोनी-भोसे परिसरात पोहोचल्याशिवाय बंद केले जाणार नाही. योजना ही अजून २० ते २५ दिवस सुरू ठेवली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT